D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • जगतिकीकरणात सहकार क्षेत्राचा विकास आणि आव्हाने

    “ गुणवत्ता आणि कार्यक्षमता यातूनच सहकारचा विकास ”

                                                                – डॉ. जे. के. पवार

          देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये राष्ट्रीय सहकार सप्ताहानिमित्त अर्थशास्त्र विभागाच्या वतीने “ जगतिकीकरणात सहकार क्षेत्राचा विकास आणि आव्हाने ” या विषयावर प्राचार्य डॉ. जे. के. पवार यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी सहकाराची उत्पत्ती, उद्देश व कार्य यांचा आढावा घेऊन जगतिकीकरणात सहकारामध्ये समाजाची भूमिका, नैतिक विकास, निष्ठा व स्वावलंबन याचा अवलंब करून सहकारातून समृद्धीकडे जाताना विविध आव्हानांचा आढावा घेतला तसेच देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांनी सहकार क्षेत्राच्या विकाससाठी दिलेले योगदान व कार्य तसेच विविध संस्थाची उभारणी कशी केली याची माहिती दिली.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. बी. टी. नाईक केले. अध्यक्षस्थान कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील सर भूषविले यावेळी प्राध्यापक व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमासाठी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. राजनीताई मगदुम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदुम, व सचिव विश्वनाथ मगदुम, यांचे प्रोत्साहन लाभले तर आभार डॉ. आर. एस. नाईक यांनी मानले.