D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • कॉमर्स कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहात संपन्न.

                 शिक्षक दिनाचे औचित्य साधून डी .आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाची रूपरेषा  विद्यार्थ्यांद्वारा आखण्यात आली होती. कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन बारावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. शिक्षक दिनानिमित्त अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून ज्ञानार्जनाचे कार्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील तसेच ज्युनिअर  विभाग प्रमुख श्री बी. डी. डवंग होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. तसेच गुरुजनांचे पाद्यपूजन करून छानशी रोप भेटवस्तू म्हणून देण्यात आली. विद्यार्थ्यांनी भाषण, नाटक,नृत्य,गायन इत्यादी वेगवेगळे कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.