D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • कॉमर्स कॉलेजमध्ये शिक्षक - पालक सहविचार सभा उत्साहात संपन्न.

               पालकांनी स्वतःची भूमिका जाणीवपूर्वक समजून घेतली पाहिजे.पालक हा पाल्य व शिक्षक यांच्यातील दुवा होणे गरजेचे आहे. पालक व शिक्षकांनी मुलांच्या मनातील अंत प्रेरणा जागृत ठेवण्याचा प्रयत्न करावयास हवा हे केवळ सहकार्य व समन्वयातूनच शक्य आहे. असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. ए.पाटील यांनी शिक्षक- पालक सहविचार सभेच्या अध्यक्ष स्थानावरून केले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात पालक आणि शिक्षकांची भूमिका तसेच पालक म्हणून आपली काय कर्तव्य आहेत आणि ती कशाप्रकारे बजावली पाहिजेत याचे  मार्गदर्शन ज्युनिअर विभाग प्रमुख  श्री बी.डी. डवंग यांनी केले. परीक्षा व मूल्यमापन पद्धती याविषयी श्री एम.पी. वंडकर यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजन सौ.ए. व्ही. पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.एम.पी. कोगेकर व सौ.जी. एन. धुमाळ यांनी केले.आभार प्रदर्शन श्री आर.एम. कुंभार यांनी केले.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.