D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • Dept. of Economics organised Ayushaman Card Workshop

    "देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये आयुष्यमान कार्ड मार्गदर्शन व कार्यशाळा संपन्न"
                    दि. 23 आॅक्टोबर 2023 रोजी देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये अर्थशास्र विभागाच्या वतीने "आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना" याविषयी मार्गदर्शन व आयुष्यमान कार्ड काढण्याची कार्यशाळा प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही. ए. पाटील सर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये आरोग्याचे महत्त्व, काळजी आणि त्यासाठी शासनाच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या योजना यांची माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून या योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी प्रेरित केले केले तसेच शासन आपल्या दारी या योजनेत तरुणांचा सहभाग ही आवश्यक आहे हे सांगितले तसेच महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी विविध योजना व कार्यक्रम आखत आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले तसेच प्रमुख मार्गदर्शक श्री किरण कुंडलकर, विभागीय व्यवस्थापक कोल्हापूर व डॉक्टर रोहित खोलकुंबे जिल्हा समन्वयक, कोल्हापूर (महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग) श्री किरण कुंडलकर सर यांनी विद्यार्थ्यांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना याविषयी विस्तृत स्वरूपात माहिती दिली तसेच शासनाची ही योजना देशातील नागरिकांचे आरोग्य व आर्थिक समस्या सोडविण्यासाठी कशी महत्त्वपूर्ण आहे या योजनेच्या माध्यमातून आयुष्यमान कार्ड काढल्यानंतर नागरिकास कोणकोणते लाभ होणार आहे व रु. पाच लाख पर्यंतचा दवाखान्याचा खर्च शासन कसा उचलणार आहे तसेच कोणत्या दवाखान्यामध्ये किती आजारावर औषध उपचार केले जातील याविषयी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांना आयुष्यमान कार्ड कसे काढावे याचे प्रशिक्षण ही देण्यात आले.
               सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्ष सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, सदस्य अॅड. वैभव पेडणेकर व अॅड. अमित बाडकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण सोरटे यांनी केले, कार्यक्रमासाठी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. एस.एफ. बोथीकर, डॉ. एस. एस. जमादार, प्रा. एम. जे. कुलकर्णी, प्रा. एम. एन. महाडिक, डॉ. ए. जी. पवार, प्रा. एम. एन. मुजावर व प्रा.बी.ए. कश्यप, प्रा. एम. एस. वाडकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांचे आभार डॉ. व्ही. व्ही. जगताप यांनी मांडले.