D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • ५५ विद्यार्थ्यांची TCS कंपनी मध्ये निवड

    "कॉमर्स कॉलेजच्या ५५ विद्यार्थ्यांची TCS कंपनी मध्ये निवड."

    कोल्हापूर येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये दिनांक १६ डिसेंबर २०२३ रोजी TCS (Tata Consultancy Services) कंपनीचा रोजगार मेळावा यशस्वी रित्या पार पडला. त्यामधील महाविद्यालयातील ७० विद्यार्थ्यांनी मुलाखती दिल्या. या मुलाखती करिता महाविद्यालयाने इंटरव्हू टेकनिक्स् वर ४ दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेची विद्यार्थ्यांना इंटरव्हू मध्ये मोलाची मदत मिळाली व या आधारे महाविद्यालयातील ५५ विद्यार्थ्यांना यश मिळाले. महाविद्यालयातर्फे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम व सदस्य अॅड. वैभव पेडणेकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील विद्यार्थी हे जास्तीत जास्त रोजगाराभिमुख बनतील यासाठी महाविद्यालयात वेगवेगळ्या विषयांवर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य होत असलेचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन ट्रेनिंग ऑन्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. रोनीत खराडे यांनी केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या सत्कार समारंभासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम व संचालक अॅड. वैभव पेडणेकर आणि अॅङ अमित बाडकर यांचे मार्गदर्शन लाभले.