D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • कॉमर्स कॉलेजमध्ये शिक्षक -पालक सहविचार सभा उत्साहात संपन्न.

                      विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पालक व शिक्षक या नाण्याच्या दोन्ही बाजूंची गरज असते. दोन्ही बाजूंनी समान पोषक वातावरण मिळाल्यास विद्यार्थी नक्कीच उच्च स्तरावर जाऊन पोहोचतील व आदर्श समाज घडवण्यास हातभार लावतील.असे प्रतिपादन महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी शिक्षक पालक सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानावरून  केले.नवीन शैक्षणिक धोरण तसेच त्याच्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पालकांनी पाल्य व शिक्षक यांच्यातील दुवा होणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले. मुलांचे  भवितव्य घडविण्याच्या कार्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते.उद्याच्या जगातील उत्तम नागरिक आणि भविष्यातील खरीखुरी संपत्ती म्हणजे मुले होय. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात पालक आणि शिक्षकाची भूमिका तसेच पालक म्हणून आपली काय कर्तव्य आहेत आणि ती कशाप्रकारे बजावली पाहिजेत याचे मार्गदर्शन ज्युनिअर विभागप्रमुख मा.श्री बी.डी.  डवंग यांनी केले. पालक सभेचे आयोजन, स्वागत व प्रास्ताविक प्रा.सौ. ए. व्ही. पाटील यांनी केले. प्रास्ताविकामध्ये आजच्या वाढत्या स्पर्धेत टिकताना विद्यार्थ्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.अशा परिस्थितीत कॉलेज व कुटुंब यांच्यातील सहकार्यात्मक संबंध वाढायला पाहिजेत असे त्यांनी नमूद केले.परीक्षा व मूल्यमापन पद्धती याविषयी  प्रा. श्री.एस. एन. ढोबळे व प्रात्यक्षिक परीक्षे संदर्भात  प्रा. स्वाती पोवार यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. जी.एन. धुमाळ व प्रा. सौ. ए. एस. मगदूम यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. श्री. एम. पी.  वंडकर यांनी केले.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.