D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • कॉमर्स कॉलेजमध्ये महिलांविषयक अत्याचार प्रतिबंध जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन.

                         कॉलेज जीवनामध्ये विद्यार्थ्यांचा मोबाईल वापराकडे अधिक कल दिसून येतो. समाज माध्यमांच्याअयोग्य वापरामुळे अल्पवयीन मुला मुलींमध्ये सायबर गुन्हेगारीचे प्रमाण देखील वाढले आहे.परिणामी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येते. त्यासाठी आजच्या युगातील युवक युवतींनी आपल्या शिक्षण व करियरकडे अधिक लक्ष देऊन मोबाईलचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे तसेच मुली व महिलांच्यावर होणाऱ्या अत्याचार व छेडछाड विरुद्ध मुलींनी कोणतीही भीती न बाळगता निर्भया पथकाकडे तक्रार केली पाहिजे ज्यामुळे अशा प्रवृत्तीस आळा घालता येईल. असे प्रतिपादन शहरातील निर्भया पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक दिपाली पाटील यांनी केले.देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आयोजित मार्गदर्शनपर कार्यक्रमातात त्या बोलत होत्या. सदर कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक कोमल पाटील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक इक्बाल महात यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही. ए. पाटील होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य  डॉ. व्ही. ए. पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापिका सौ. टी. एस. चौगुले यांनी केले.