D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • "कॉमर्स कॉलेजमध्ये प्रेरणादायी व विनोदी सादरीकरणावरआधारित कार्यक्रमाचे आयोजन".

          वडील आणि गुरु यांना जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यक्तीच्या जीवनातील ते खरे प्रेरणास्त्रोत आहेत.आजच्या स्पर्धात्मक व समाज माध्यमांच्या जगात विद्यार्थ्यांनी आनंदी व तणावमुक्त जीवन जगले पाहिजे.त्यासाठी जीवनात हास्य व विनोदआवश्यक आहे.असे प्रतिपादन माननिय  श्री.एम. के गोंधळी माजी शिक्षण उपसंचालक यांनी केले. देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आयोजित 'आणि आसूही हसले खुदु खुदु , खदा खदा'या हास्य विनोद परकार्यक्रमात ते बोलत होते.त्यांनी आपल्या ओघवत्या शैलीने व भारदस्त आवाजाने वात्रटिका व नभोनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. ए.पाटील होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक प्रा.बी.डी. डवंग यांनी करून दिला. तर सूत्रसंचालन प्रा. स्वाती पोवार यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा.सुषमा एस. पाटील यांनी केले.सदर कार्यक्रमास प्रसिद्ध  एकपात्री नाट्य कलाकार श्री.राजेंद्र प्रधान उपस्थित होते.त्याचप्रमाणें सर्व प्राध्यापक वृंद व विद्यार्थीही मोठ्या संख्येनें उपस्थित होते.