D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर मध्ये आंतराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.

    स्त्री चा आणि स्त्रीत्वाचा आदर करा: डॉ. निरुपमा सखदेव

                    देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर मध्ये आंतराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. कै. पार्वतीदेवी रत्नाप्पा कुंभार स्त्री विकास व संशोधन मंचतर्फे स्त्री आरोग्य या विषयावर प्रसिध्द स्त्री रोग तज्ञा डॉ. निरुपमा सखदेव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी कौन्सिल ऑफ एज्युकेशन चे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. डॉ. सखदेव यांनी 'माझी ओळख माझ्याशी' या विषयावर बोलताना स्त्री जीवनाचे विविध पैलू, मासिक पाळी आणि समस्या , गर्भारपणतील स्थित्यंतरे, प्रसूती, स्त्रियांना होणारे कर्करोग, इंडोमेट्रोयोसिस, पी सी ओ डी, अनियमित मासिक पाळीवर उपाय, नियमित व चौकस आहार, व्यायाम, योगाभ्यास , ध्यानधारणा, प्रसूती, नैसर्गिक बदल, कुटुंब नियोजनाचे महत्व, रजोनिवृत्ती व स्वास्थ्य, मानसिक संतुलन, लिंगनिदान इत्यादी विषयावर सखोलपणे व मार्मिकपणे आपले विचार मांडले. आपल्या संस्थेत ७०% मुली शिकत असल्याचा अभिमान असल्याचे संस्थेचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी नमूद केले. स्वतःला सिद्ध करा व स्वतः शी स्पर्धा करा, असे मत त्यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले. याप्रसंगी नाईट कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. जे. फराकटे, नर्सिंग कॉलेज चे प्राचार्य बी. डी. कुलकर्णी, डॉ. सुनंदा कदम इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पार्वती मंच च्या समन्वयक डॉ. सुप्रिया चौगुले यांनी केले, आभारप्रदर्शन कॉमर्स कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ. आर. एस. नाईक यांनी मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.मेघाली जाधव हिने केले, कार्यक्रमास ३०० हुन अधिक विध्यार्थी उपस्थित होते.