D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

 • देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयामध्ये 12वी गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.

          "स्पर्धेच्या युगामध्ये ज्यांचा पाया मजबूत आहे त्यांना यशापासून कोणीही रोखू शकत नाही", असे गौरव भाष्य महाविद्यालयाचे  प्र. प्राचार्य डॉ. आर एस नाईक यांनी बारावी गुणवंत विद्यार्थी सत्कार  कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून केले.  गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे महाविद्यालयाची उंची वाढत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून ते म्हणाले आई वडील आणि गुरुजनांनी केलेले संस्कार कधीही विसरू नका. मार्च एप्रिल 2024 मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल महाविद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी दुपारी चार वाजता  महाविद्यालयात आयोजित करण्यात आला.
  कनिष्ठ विभागाचे समन्वयक प्रा बी. डी.डवंग यांनी आपल्या मनोगतात गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच ध्येय गाठण्याची जिद्द बाळगा,आयुष्यात असे काही करा की आई-वडिलांना आणि गुरुजनांनाही तुमचा अभिमान वाटेल. अशा शब्दात  त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
       व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च /एप्रिल 2024 मध्ये जनरल कॉलेजचा निकाल 98.73% लागला.
  बलभीम प्रकाश कोकाटे याने 94.17% मार्क्स मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. तसेच अनुश्री किसन बारटक्के व श्रुती सुरेश मगदूम या दोघींनी 94% मिळवून द्वितीय आणि सुरभी समीर  केसतीकर हिने 93.67%  अनुक्रमे तिसरा क्रमांक मिळवला. एम.सी.वी.सी.विभागाचा निकाल शंभर टक्के लागला. एम.सी.वी.सी. विभागामध्ये स्नेहा सुरेश साळुंखे हिने 88.33% मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला .प्रणिता रमेश दळवी हिने 87.50% मिळवून द्वितीय व मसीरा मुबारक सुभेदार हिने ८६% गुण मिळवून महाविद्यालयात  तृतीय येण्याचा बहुमान पटकावला. महाविद्यालयाच्या २६ विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त केले. 152 विद्यार्थ्यांनी 75% पेक्षा गुण जास्त गुण प्राप्त केले.  187 विद्यार्थ्यांनी 60% पेक्षा अधिक प्राप्त केले. बलभीम प्रकाश कोकाटे व सुरभी समीर केसतिकर या पारितोषिक प्राप्त गुणवंतांनी यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी शेअर केलेले कृतज्ञचे शब्द आणि पालकांनी केलेले कौतुक आणि दिलेले प्रोत्साहन यामुळे औपचारिक सोहळ्याला एक नवीन दृष्टिकोन जोडला.यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम , सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम , सदस्य ऍड. वैभव पेडणेकर,ऍड.अमित बाडकर यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागत प्रा. स्वाती  पोवार यांनी केले. 
        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ अश्विनी मगदूम यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. सुषमा पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.