D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • Tree Plantation Campaign on 17/06/2024

    कॉमर्स कॉलेजची वृक्षारोपण मोहीम

    येथील देशभक्त रत्नाप्पा कुभार कॉलेज ऑफ कॉमर्स कोल्हापूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे  स्वयंसेवक व राष्ट्रीय छात्रसेना कॅडेट्स यांनी  “जागतिक पर्यावरण दिनानिमित्त" आलमप्रभू टेकडी (रामलिंग), ता. हातकनगले जि. कोल्हापूर  येथे  वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. या या कार्यक्रमाअंतर्गत १५० देशी रोपांची लागवड करण्यात आली. सदर उपक्रमाचे आयोजन शासन, शिवाजी विद्यापीठाच्या सुचना, कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. व्ही. एन. मगदूम  आणि महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉआर. एस. नाईक यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. . एस. बन्ने, प्रा. बाबासाहेब कश्यप  आणि स्वयंसेवकांनी केले. या उपक्रमाकरिता कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉ. व्ही. एन. मगदूम,  महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. आर. एस. नाईक,  प्रा.. बाबासाहेब कश्यप, डॉ. कुबेर दिंडे, प्रा. प्रकुल मांगोरे-पाटील, अमर नाईक, अतुल कोठावळे,   आणि ४४ स्वयंसेवक उपस्थित होते.

    Full Report News