देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, कोल्हापूर येथे १५० व्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. महाविद्यालायचे प्र. प्राचार्य डॉ. आर. एस. नाईक यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या बरोबरच दुपारी १.०० वाजता “राजर्षी शाहू आणि विद्यार्थी” या विषयावर प्रा. डॉ. अरुण शिंदे नाईट कॉलेज ऑफ आर्टस अँड कॉमर्स, कोल्हापूर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शाहूंचे विचार आचरणात आणावेत असे डॉ. शिंदे प्रतिपादन केले. प्रा. बी. डी. डवंग यांनी प्रमुख वक्त्यांचे स्वागत केले. प्रा. एम. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रासेयो अधिकारी डॉ. ए. एस. बन्ने यांनीआपले मनोगत व्यक्त केले. व्याख्यानाकारीता रासेयो स्वयंसेवक, विद्यार्थी यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. सौ. अश्विनी मगदूम यांनी सूत्रसंचालन केले.
Full Report with images
01 Jul, 2025
27 Jun, 2025
21 Jun, 2025
16 Jun, 2025
02 Jun, 2025