कोल्हापूर : येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्सच्या दोन विद्यार्थ्यांची गॅलेगर या नामांकीत अमेरीकन कंपनीमध्ये निवड झाली. गॅलेगर कंपनीने वाणिज्य पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी विद्यार्थिनी चा नुकताच कैंपस मेळावा झाला त्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिक्षा, मुलाखती दिल्या त्यातून सुर्यभान माणगांवकर आणि आदिती चौगुले या दोन विद्यार्थ्यांची निवड करणेत आली.
गॅलेगर या अमेरीकन नामांकीत कंपनीमधे सुर्यभान माणगांवकर आणि आदिती चौगुले या दोन विद्यार्थ्यांची निवड झालेबद्दल कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई विश्वनाथ मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद विश्वनाथ मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, संचालक अॅड. श्री. वैभव पेडणेकर, संचालक अॅड. श्री.अमित बाडकर, प्र. प्राचार्य डॉ. आर. एस. नाईक, मा.अधिक्षक श्री. वैभव काळे, प्रा. रोनित खराडे यांनी यशाबद्ल अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.