आपल्या कॉलेजमध्ये ज्युनिअर विभागात इयत्ता अकरावी मध्ये शिकत असणारा श्रेयश चौगले याने विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. व त्याची सातारा येथे होणाऱ्या विभागीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली. त्याला कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम सदस्य ॲड.वैभव पेडणेकर व ॲड .अमित बाडकर यांचे प्रोत्साहन लाभले तर महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. आर. एस. नाईक, पर्यवेक्षक बी. डी. डवंग, क्रीडा शिक्षक प्रकुल पाटील-मांगोरे यांचे मार्गदर्शन लाभले.