मतदान जनजागृती अभियानांतर्गत कोल्हापूर शहरांमधील विविध चौकामध्ये दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमवेत प्रभात फेरीचे आयोजन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदार जागृती विषयी घोषणा देत लोकांच्या मध्ये मतदान जागृती निर्माण केली. प्रभावी मतदान घोषवाक्यांनी सारा परिसर दुमदुमून गेला.
निकोप लोकशाही करता मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक असून यासाठी विध्यार्थ्यांनी पदयात्रे द्वारे मतदार राजाला दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधान सभेच्या मतदान प्रक्रिये मध्ये सक्रिय व उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी , ज्युनियर विभागाचे उपप्राचार्य श्री. एम.पी.वंडकर सुपरवायझर श्री.बी.डी.डवंग तसेच सर्व शिक्षक वृंद व मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले.
WhatsApp Video 2024-11-16 at 10 20 26 AM WhatsApp Video 2024-11-16 at 10 20 27 AM
27 Jun, 2025
21 Jun, 2025
16 Jun, 2025
02 Jun, 2025
31 May, 2025