एम.बी.ए प्रवेश प्रक्रिया २०२५-२०२६*
एम.बी.ए. सीईटीसाठी 2025-2026 करिता नोंदणी प्रक्रिया दिनांक 25 डिसेंबर पासून सुरु झालेली असून अंतिम दिनांक 25 जानेवारी 2025 आहे. सीईटी सेलकडून मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (MBA) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्या नंतर एम.बी.ए. सीईटी परीक्षा 2025-2026 साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ अनुदान आयोग किंवा भारतीय विद्यापीठांच्या असोसिएशनने मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठातून कमीतकमी 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तर, राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 45 टक्के गुणांची मर्यादा निश्चित करण्यात आलीय. कोणत्याही शाखेत मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठातून पदवीधर झालेल्या पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षेला बसणारे सर्व उमेदवार पात्र असतील.