D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

  • स्कूल कनेक्ट अभियानांतर्गत कार्यशाळा

    येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये शासनाच्या स्कूल कनेक्ट (एनईपी कनेक्ट) अभियान 2.0 अंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या निर्देशानुसार दोन सत्रांमध्ये कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षामार्फत करण्यात आले होते.  दि. १६ व १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता पार पडलेल्या या कार्यशाळेमध्ये १२ वी च्या एकूण ५२५ विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व त्यामुळे उच्च शिक्षणात होणाऱ्या महत्त्वपूर्ण बदलांविषयी प्रबोधन करण्यात आले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे बदललेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा श्रेयांक आराखडा (क्रेडिट डिस्ट्रिब्युशन स्ट्रक्चर), नव्याने आलेले विषय, बहुविद्याशाखीय, रोजगाराभिमुख व कौशल्याधिष्ठित शिक्षण, त्याचे मूल्यमापन, ऑनलाईन शिक्षण, एकाच वेळी दोन पदवी अभ्यासक्रम अभ्यासता येण्याची तरतूद, अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स, मल्टिपल एन्ट्री व मल्टिपल एक्झिट, त्याविषयीच्या तरतुदी, तीन व चार वर्षीय पदवी, तसेच एक व दोन वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रम इत्यादींविषयी या कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन आय.क्यु.ए.सी. चे समन्वयक डॉ. एस. बी. राजमाने यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. सौ. व्ही. व्ही. मैंदर्गी होत्या. अध्यक्षीय मनोगतातून त्यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांची व सोयीसुविधांची माहिती देताना त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगार संधीविषयी मार्गदर्शन केले. तसेच प्रा. एस. टी. महाडीक यांनी बी.बी.ए. आणि बी.सी.ए. या पदवी अभ्यासक्रमांना आवश्यक असणाऱ्या सीईटी व इतर महत्वपूर्ण बाबींविषयी, डॉ. एस. एफ. बोथीकर यांनी सी. ए. या अभ्यासक्रमाविषयी तर प्रा. रोनित खराडे यांनी प्लेसमेंट विषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. कनिष्ठ महाविद्यालयाचे उप-प्राचार्य प्रा. एम. पी. वंडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. बी. डी. डवंग, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एस. नाईक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बी. ए. कश्यप व प्रा. सौ. ए. एस. मगदूम यांनी केले. कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौ. रजनीताई मगदूम, उपाध्यक्ष डॉ. प्रसाद मगदूम, सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम यांचे मार्गदर्शन मिळाले.