विद्यार्थ्यांच्या यशस्वी भविष्यासाठी शिक्षक आणि पालक यांच्यातील संवाद आणि सहकार्य अनिवार्य आहे. याच उद्देशाने कॉमर्स कॉलेजमध्ये शिक्षक-पालक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. डॉ. वर्षा मैंदर्गी होत्या.
आपल्या प्रेरणादायी भाषणात त्यांनी असे सांगितले की, "विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षक आणि पालक यांनी एकत्रितपणे कार्य करणे गरजेचे आहे. फक्त पुस्तकी ज्ञान पुरेसे नसून, नैतिक आणि मानसिक बळ देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विद्यार्थी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांइतकीच पालकांचीही आहे, त्यामुळे त्यांना सतत योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणा द्यायला हवी."
शैक्षणिक, सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, नैतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी हे उपक्रम कसे उपयुक्त ठरतात, यावर त्यांनी भर दिला.
त्यांनी विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शन, विविध स्कॉलरशिप योजना, व्यावसायिक कौशल्यविकास कार्यशाळा आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमांविषयी माहिती दिली.
ज्युनिअर विभागप्रमुख श्री. बी. डी. डवंग यांनी विद्यार्थ्यांचे नियमित मूल्यमापन, उपस्थिती सुधारण्याचे उपक्रम आणि शैक्षणिक प्रगतीसाठी घेतल्या जाणाऱ्या विशेष उपाययोजनां विषयी पालकांना जागरूक केले.
शिक्षक आणि पालक यांनी विद्यार्थ्यांच्या यशासाठी सतत संपर्कात राहावे, त्यांना सकारात्मक वातावरण उपलब्ध करून द्यावे आणि त्यांच्यात आत्मविश्वास व स्वप्रेरणा निर्माण करावी, असे त्यांनी सुचवले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. सौ. ए. एस. मगदूम यांनी विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या आधुनिक आव्हानांवर प्रकाश टाकला. "फक्त चांगले गुण मिळवण्यावर भर न देता, विद्यार्थ्यांना जीवनमूल्ये शिकवणे अधिक महत्त्वाचे आहे," असे त्यांनी नमूद केले.
सभेच्या उत्तरार्धात पालकांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसंदर्भात काही प्रश्न मांडले. वरिष्ठ शिक्षकांनी अतिशय समाधानकारक उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.
महाविद्यालयाचे यूट्यूब चैनल, फेसबुक पेज व इंस्टाग्राम पेज याविषयी महाविद्यालयाचे पीआरओ श्री. निरंजन सवणे यांनी पालकांना सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. जी. एन. धुमाळ आणि प्रा. सौ. एम. पी. कोगेकर यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. श्री. आर. एम. कुंभार यांनी केले.
या पालक सभेला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षक-पालक सहकार्याचा हा नवा अध्याय निश्चितच एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे!