D.R.K. College of Commerce, Kolhapur

Blog Post

 • Alumni Meet 2021

  *डि आर के :  माजी विद्यार्थी सन्मान सोहळा*

  २०१६ ला *श्री विलास पाटील* हे १९५७ साली स्थापन झालेल्या *कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचालीत काॅमर्स काॅलेज* च्या प्राचार्य पदी आरुढ झाले नंतर जवळ जवळ दरवर्षी माजी विद्यार्थी सन्मान सोहळा घेतला जात आहे.या वेळच्या सोहळ्याला नुकतेच युजीसी व शिवाजी विद्यापिठाकडुन महाविद्यालयाला स्वायत्तता (Autonomous Status) प्राप्त झाल्याची पार्श्वभुमी आहे.
     आज दुपारी ३ वाजता काॅमर्स काॅलेज च्या एमबीए काॅन्फरन्स हाॅलवर पार पडलेल्या या मेळाव्याला अल्प प्रसिद्धी मिळाल्याने माजी विद्यार्थी लोकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला.
    सुरवातीला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा, पदाधिकारी आणि निवडक संचालकांच्या भाषांवर आधारीत एक चित्रफित प्राॅजेक्टर वर दाखवणेत प्रास्ताविकात आली.कार्यक्रमाच्या पाहुन्यांचा परिचय,स्वागत आणि आभारप्रदर्शन सोपस्कार आटोपल्यावर आपल्या विस्तृत प्रास्थापिकात प्राचार्य व्हि ए पाटील यांनी संस्थेची वाटचाल विषद केली.गेल्या ५ वर्षांच्या अथक प्रयत्नाना यश येऊन चालु वर्षांपासुन आपण स्वायत्त झालो आहोत याची माहिती देताना माजी विद्यार्थी संघाची अमुल्य  मदत झाल्याचे त्यांनी नोंदवले.प्रत्यक्षात हि स्वायत्तता कशी असते याची ही इत्यंभूत माहिती द्यायला विसरले नाहीत.
  उपस्थित माजी विद्यार्थी लोकांशी चर्चासत्राचा आरंभ करण्यापुर्वी आपण आपल्या मनोगतात काॅलेजच्या नविन सर्टिफिकेट कोर्सेस स्थापनेसाठी उचीत सुचना ही कराव्यात असे त्यांनी सुचीत केले.काॅमर्स काॅलेज,नाईट काॅलेज आणि लाॅ काॅलेज नंतर आता लवकरच नर्सिंग कॉलेज ही सुरु होत आहे जर यासाठीची इमारत पुर्णत्वाकडे आली आहे ही माहिती त्यांनी ओघांत दिली.
      सुसंवाद सत्राची सुरवात करताना राष्ट्रिय केमिकल्स फर्टिलायझर्स चे सीईओ श्री अशोक कुंभार यांनी आपली नियुक्ती आणि आत्तापर्यंत ची वाटचाल थोडक्यात विषद करताना मराठी माध्यमात बी काॅम होणे कमी पणाचे न मानताना स्वयम शिक्षणाची (self study) अत्यावश्यकता प्रतिपादली.अन्य वक्त्त्यांमधुन अनेक सुचना पुढे आल्या.उदा.अभ्यासक्रमांत सोशल सायन्सचे विषय समाविष्ट करावेत,एन सी सी सारखे अभ्यासक्रमाव्यतिरीक्त उपक्रम राबवावे,व्यक्तिमत्व विकास,कौशल्य विकास,तंत्रशिक्षण, व्यवसायाभिमुख संरचनात्मक सहाय्य यंत्रणा सारख्या गोष्टींना प्राधान्यता द्यावी अशा गोष्टींचा अंतर्भाव सुचनांमध्ये‌ होता.जवळपास डझनभर वक्ते या चर्चासत्रात सामिल झाले.
    मग आपल्या अध्यक्षिय भाषणात डॉ मगदुम यांनी माजी विद्यार्थी संघ आणि सामान्य माजी विद्यार्थी यांचे कडुन आर्थिक आणि वैचारिक पाठबळाची अपेक्षा व्यक्त केली.शिवाय नव संशोधकांची वाणवा लक्षात घेता उदयोन्मुख संशोधकांना सर्वसोयीनियुक्त व्यासपिठ उपलब्ध करून देण्यासाठी एक संचीत फंड गोळा करवुन त्यातुन आर्थिक तरतूद करावी असे सांगुन फंडात स्वत: १ लाख रुपये जमा करुन शुभारंभ ही केला.सदर फंडात देणगी रुपात मदत करुन माजी विद्यार्थी आणि समाजातील दानशूर मंडळींनी आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन देखिल केले.
    कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात माजी विद्यार्थी संघाच्या वतीने काॅलेजच्या भविष्य कालीन योजनांकरता सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल अशी हमी भरणेत आली.कौन्सिलच्या कार्यवाह ने शेवटी पाहुणे,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी संघाचे प्रतिनिधि आणि उपस्थित माजी विद्यार्थी मंडळींचे उपस्थिती आणि सहभागाकरता आभार प्रदर्शन केले.